बहुजननामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघात चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी संजू सॅमसन हा योग्य पर्याय ठरु शकतो. असे हरभजनसिंहने सुचविले आहे. सॅमसनच्या नावाबद्दल त्याने नुकतेच ट्विटरवरुन सुचविले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघात चौथ्या स्थानावर कोणता खेळाडू असावा याविषयी चर्चा सुरु होती. जुनमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये देखील भारताला याचा मोठा फटका बसला. भारताकडे आघाडीला मजबूत फलंदाज असून मधल्या फळीत मात्र भारताकडे अनुभवी फलंदाज नाही. त्यामुळे भारताला सध्या चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची गरज आहे.
Why not @IamSanjuSamson at number 4 in odi.. with good technique and good head on his shoulders.. well played today anyways against SA A
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 6, 2019
हरभजनसिंह याने ट्विट करत म्हटले कि, भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी संजू सॅमसन हा योग्य पर्याय वाटतो. त्याने भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना शानदार ९१ धावांची खेळी करत भारतीय संघाला ३६ धावांनी विजय मिळवून दिला. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकासाठी संजू सॅमसन चांगला खेळाडू ठरू शकतो. त्यावरून हरभजनसिंह आणि युवराज सिंह यांच्यात ट्विटरवर फिरकीयुद्ध रंगले होते.
हरभजनसिंह याने चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात कोण योग्य आहे, हे सांगितले. त्यावर युवराज सिंह याने उत्तरावर त्याची फिरकी घेतली. त्यावर युवराजसिंह याने त्याची फिरकी घेत त्यावर ट्विट करताना म्हटले कि, भारताची आघाडीची फळी मजबूत आहे भावा.. त्यांना चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजांची गरज नाही. त्याचबरोबर त्याने एक हसरा इमोजी देखील टाकला. त्यामुळे युवराजने सर्व आघाडीच्या फलंदाजाना एकप्रकारे चिमटाच काढला.
दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत चौथ्या क्रमांकासाठी अनेक खेळाडूंना संधी दिली असून एकाही खेळाडूला या स्थानावर जम बसविता आलेला नाही.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत