बहुजननामा ऑनलाईन – एखादी महिला जेव्हा पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवते तेव्हाच ती गरोदर होते. मात्र, ब्रिटनमधील हॅम्पशायर शहरात अशी एक घटना घडली आहे, त्यामध्ये एक महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स न करताही ती गरोदर राहिली आहे. जेव्हा डॉक्टरांनी तिला ती गरोदर असल्याचे सांगितले तेव्हा तिला धक्काच बसला.
काय आहे नेमकं प्रकरण
८ वर्षांपूर्वी २८ वर्षीय निकोल हिला अचानक कोरड्या उलट्या झाल्या व मळमळ होऊ लागली. त्यानंतर तिने डॉक्टरला दाखवले असता, तिची प्रेग्नेन्सी टेस्ट करण्यात आली. मात्र, निकोला हिने सांगितले की, तिने कधीच तिच्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स केलेला नाही. मात्र, असे असतानासुद्धा तिचा प्रेग्नेन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिला धक्काच बसला. तेव्हा डॉक्टरांनी तिला पुन्हा तिच्या संबंधाविषयी विचारले असता तिने सांगितले की, तिने व तिच्या बॉयफ्रेंडने अनेकदा प्रयत्न करूनसुद्धा ते सेक्स करू शकले नाहीत, कारण सेक्ससाठी प्रयत्न करताना तिला प्रचंड वेदना होत होत्या.
त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या अनेक टेस्ट केल्या. या टेस्टमधून वेजिनीस्मस नावाचा आजार असल्याचे समोर आले होते. या आजारात महिलांच्या गुप्तांगातील जागेच्या मांसपेशी आकुंचन पावतात व त्यामुळे त्यांना शरीर संबंध ठेवताना खूप त्रास होतो. असे असतानासुद्धा निकोल गरोदर राहिली. मात्र, सेक्स न करताही जर पुरुषाचे स्पर्म फ्ल्यूईड गुप्तांगावाटे महिलेच्या शरीरात गेले तरी महिला गरोदर राहू शकते, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. क्वचितच असा प्रकार घडतो. निकोलच्या बाबतीतसुद्धा असाच प्रकार घडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.