सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – हेळवे समाज सेवा संस्था, महाराष्ट्र राज्या यांच्या वतीने हेळवे समाज एकता मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दि.७ एप्रिल रोजी श्री खंडोबा सांस्कृतिक भवन खंडोबा मंदिर शेजारी, आकुर्डी, पुणे येथे होणार आहे.
या मेळाव्यामध्ये श्री. बसवाभृंगेश्वर शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच बरोबर यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णासाहेब बनसोडे, अखिल भारतीय कर्नाटक हेळवे समाज संघ, बेंगळुरूचे अध्यक्ष एम. नागराज, उपाध्यक्ष किट्टीकृष्णा हेळवर, सामाजिक कार्याकर्त्या अंकिता हेळवर, रामू सर, शरणप्पा हेळवर, सुनीलकुमार हेळवर, हेळवे समाजाचा इतिहास लिहणारे प्रणव पाटील, भटक्यांची भटकंती पुस्तकाचे लेखक सुर्यकांत भिसे, सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. समाज एकता मेळाव्यामध्ये समाज बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.