मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अंधेरी येथे विधानसभेच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीवर (Andheri East By-Election) राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latake) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. परंतु त्या महापालिका कर्मचारी असल्याने त्यांना अगोदर नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा आणि नियमाप्रमाणे एक महिन्याचे वेतन कोषागारात जमा केले आहे. तरी देखील त्यांच्या राजीनाम्याच्या कार्यवाहीला 30 दिवसांचा अवधी लागेल, असे महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी सांगितले आहे. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेत आयुक्त दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्याला आता सेनेच्या बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा नियमाप्रमाणेच मंजूर होईल, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांनी दिलेला राजीनामा नियमाप्रमाणे मंजूर करुन घेण्याचे काम पालिका व्यवस्थापनाचे आहे. त्यामुळे तो मंजूर केला जाईल. राजीनामा दिल्यानंतर त्यात मुख्यमंत्री किंवा मंत्री लक्ष घालतात, असे कुठे असते का? राजीनामा मंजूर करण्याची एक प्रक्रिया असते. प्रोसेसमध्ये काही नियम असतात, त्यानुसार त्यावर कार्यवाही केली जाते. काही काम नाही झाले की सरकारवर बोट दाखवायचे एवढंच काम आता शिवसेनेला राहिले आहे, दुसरे काही काम राहिले नाही, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.
दरम्यान, आयुक्तांनी राजीनामा स्वीकारला असून त्याला 30 दिवसांचा अवधी दिला आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ मान्य करण्यात आला नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
त्यामुळे आता शिवसेना मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेणार हे निश्चित झाले आहे.
Web Title :- Gulabrao Patil | rankandan over resignation shinde groups response to thackeray groups allegations gulabrao patil said
हे देखील वाचा :
Pune Accident | शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात हॉटेल मॅनेजरसह तीन तरुण ठार