Gulabrao Patil | ‘राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही’, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

Gulabrao Patil | minister gulabrao patil criticism on shivsena mp sanjay raut

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. दीड वर्षांनी आमदारकीच्या निवडणुका (Legislative Elections) होणार आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीण (Jalgaon Rural) मधून निवडणूक लढवून दाखवावी, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राऊतांना (Maharashtra Political News) दिले आहे. तसेच संजय राऊतांनी खासदारकीला आमची 41 मते घेतली आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा (Resignation) दिला पाहिजे. राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही आणि ते देणार ही नाहीत अशा शब्दात पाटलांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

 

 

शिवसेना फोडणाऱ्यावर आमचा राग

रविवारी पाचोऱ्यात झालेल्या सभेत राऊत काय बोलले आपल्याला माहिती आहे. ते फक्त गुलाबो गँग (Gulabo Gang)
बोलले आणि खाली बसले. कुठलंही व्हिजन नसलेले काम त्यांनी केला आहे. उद्धव साहेबांच्या बाबतीत आमचा राग नाही. पण जो माणूस ज्याने शिवसेना (Shivsena) फोडली त्याच्या बाबतीत आमचा राग असल्याचे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. मला तर वाटतं त्या माणसाच्या कानात सांगण्यात आलं असावं की शांत रहा. यामुळे राऊतांनी तीन मिनीटात आपलं भाषण संपवल्याची टीका पाटील यांनी केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राजीनामे तयार ठेवा सांगणारे राऊत कोण?

आमचे राजीनामे तयार ठेवा असं सांगणारे संजय राऊत कोण आहेत. आमच्या मतावर मोठे झालेली ही लोकं आहेत. आमची 41 मते त्यांनी घेतली आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनीच राजीनामा दिला पाहिजे, असे पाटील म्हणाले. आधी चुकीच्या गोष्टी बोलायच्या आणि त्यानंतर नामर्द म्हणायचं हे कुठपर्यंत चांगलं आहे. भाषणाची तुलना करा आपण काय वाक्य वापरतो आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या म्हणण्याने आमच्या प्रतिमेला कोणताही धक्का लागणार नसल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

 

 

Web Title :- Gulabrao Patil | minister gulabrao patil criticism on shivsena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Accident | बारसू रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, 17 पोलीस जखमी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – गुंतवणुकीची पॉलिसी नसताना गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक

Dnyan Prabodhini | ‘प्रकाशचित्रकला – एक कला,एक व्यवसाय’ विषयावर सतीश पाकणीकर यांच्याशी संवाद