Gulabrao Patil | ‘…तर परमेश्वर तुमचं भलं करो’, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

 Gulabrao Patil | gulabrao patil attacks on uddhav thackeray for joining hand with congress and ncp

रायगड : बहुजननामा ऑनलाईन शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणात बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करत असतात. तर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) त्यांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देताना पलटवार करत असतात. शनिवारी रायगड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ज्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) शिवसेनेचे (Shivsena) नुकसान केले त्यांच्यासोबत तुम्ही बसला आहात असा टोला लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राष्ट्रवादीने तीनवेळी शिवसेना फोडली

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, ज्या काँग्रेसने आम्हाला (शिवसैनिकांना) तुडवलं, ज्या काँग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडल. आधी छगन भुजबवळ (Chhagan Bhujbal), त्यानंतर नारायण राणे (Narayan Rane) आणि राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोडलं. आज तुम्ही त्याच पक्षासोबत जाऊन बसलात, असा हल्लाबोल पाटील यांनी केला.

 

… तर परमेश्वर तुमचं भलं करो

आमचा पक्ष फोडणाऱ्या सोबत जाऊन बसलेत आणि आम्हाला गद्दारांच्या रांगेत उभं केलं. पण उद्धव साहेब आम्ही 40-50,50-60 खटले आमच्या अंगावर घेऊन ही शिवसेना उभी केली आहे. 1992 च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बापही चार महिने तुरुंगात होतो. केवळ शिवसेना हा शब्द खाली जाता कामा नये यासाठी आम्ही बलीदान दिलं.
शिवसैनिकांनी बलिदान दिल. त्या बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना तुम्ही गद्दार म्हणत असाल
आणि गद्दारांच्या भरवशावर खासदार झालेल्या संजय राऊताला (MP Sanjay Raut)
तुम्ही खुद्दार म्हणत असाल तर परमेश्वर तुमचं भलं करो, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

 

Web Title :  Gulabrao Patil | gulabrao patil attacks on uddhav thackeray for joining hand with congress and ncp

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘या’ एका कारणामुळे शिंदे-ठाकरे एकत्र येणं अशक्य, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

Pune Crime News | पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

Former MLA Ashish Deshmukh | ‘नाना पटोलेंमुळे सरकार कोसळलं’, निलंबनानंतर आशिष देशमुखांचा पटोलेंवर पुन्हा घणाघात

Ajit Pawar | पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…