Former MLA Ashish Deshmukh | ‘नाना पटोलेंमुळे सरकार कोसळलं’, निलंबनानंतर आशिष देशमुखांचा पटोलेंवर पुन्हा घणाघात
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख (Former MLA Ashish Deshmukh) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Maharashtra Pradesh Congress) कमिटीच्या शिस्तपालन समितीकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आशिष देशमुख (Former MLA Ashish Deshmukh) यांच्यावर ही कारवाई केली आहे. निलंबनाच्या (Suspension) कारवाईनंतर देशमुख यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले अशिष देशमुख?
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने (Disciplinary Committee) मला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये दोन कारणे दिली आहेत. त्या संदर्भात माझं म्हणणं आहे की, मी जी काही भूमिका घेतली आहे ती काँग्रेस व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हितासाठीच घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सभेला अनुपस्थिती आणि नागपूर सभेला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी खोडा टाकला आहे. विधानसभेचे अध्यक्ष असताना तडकाफडकी राजीनामा दिला तेव्हापासूनच संशयाची सुई नाना पटोले यांच्यावर आहे असा आरोप देशमुख यांनी केला.
पटोलेंमुळे सरकार कोसळलं
आशिष देशमुख पुढे म्हणाले, काँग्रेसच्या हिताची भूमिका मी घेतली असून शिस्तपालन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. नाना पटोले यांच्यामुळे सरकार कोसळं आहे, जर नोटीस द्यायची असेल तर ती नाना पटोले यांना द्यावी. ते हायकमांडशी घनिष्ट संबंध असल्याचे सांगतात, मात्र नाना पटोले यांना देखील शिस्तभंगाची नोटीस द्यावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.
Web Title : Former MLA Ashish Deshmukh | ashish deshmukhs first reaction after his suspension from the congress was to make serious allegations against patole
हे देखील वाचा :
Ajit Pawar | पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
Ajit Pawar | ‘…म्हणून मी नॉट रिचेबल होतो’, अजित पवारांचे स्पष्टीकरण
Pune Crime News | पुणे : छातीत बुक्की मारल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यु
Comments are closed.