Maharashtra Politics News | ‘या’ एका कारणामुळे शिंदे-ठाकरे एकत्र येणं अशक्य, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Politics News | शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटातील (Thackeray Group) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एक व्हावेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु (Maharashtra Politics News) झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करु असे म्हटले होते. आता यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भविष्यात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गाटाची (Maharashtra Politics News) युती होऊ शकते का? यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राज्यात फडतूस, काडतूस अशी वक्तव्य होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येतील असं वाटत नसल्याचे भूजबळ यांनी म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अदानी प्रकरणात (Adani Case) जेपीसी (JPC) नियुक्त करण्याची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी म्हटलं. शरद पवारांच्या भूमिकेवर बोलताना भुजबळ यांनी पवारांचे समर्थन केले आहे. आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चिकरण करु नये. आपली बदनामी होता कामा नये. टाटा बिर्ला यांनी देखील खूप चांगलं काम केलं आहे.
पवारांचं म्हणणं आहे की, उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचं.
इतही अनेक मुद्दे आहेत त्यावर चर्चा झाली पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले.
Web Title : Maharashtra Politics News | chhagan bhujbals big statement about coming together of shinde group thackeray group
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार निलंबीत, जाणून घ्या प्रकरण
Ajit Pawar | पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
Comments are closed.