नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. आजही मोदी नेहमीप्रमाणे आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. आधी ते नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाची पाहणी करतील. नंतर ते केवाडियातील एका कार्यक्रमाला संबोधित करतील. मातोश्री हीराबेन यांचा आशीर्वादही घेतील.
असा असे मोदींचा दिवसभराचा प्लॅन
आईची भेट
पंतप्रधान मोदी सर्वात आधी आपली आई हीराबेन यांची भेट घेणार आहेत. आईचे आशीर्वाद घेऊन मोदी केवाडियाला दाखल होतील. नर्मदा जिल्ह्यातील एका पूजेला हजर रहात तेथे सभेला संबोधित करतील. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ही सभा होण्याची शक्यता आहे.
#WATCH Gujarat: Prime Minister Narendra Modi waves to people gathered outside Ahmedabad airport to greet him, as he arrives in the city ahead of his birthday tomorrow. pic.twitter.com/vBhJFZfmcA
— ANI (@ANI) September 16, 2019
Gujarat: Prime Minister Narendra Modi arrives in Ahmedabad. pic.twitter.com/u6IiH4Cbio
— ANI (@ANI) September 16, 2019
मोदींच्या वाढदिवसानिमित्त केवाडियामध्ये होणाऱ्या नमामि देवी नर्मदा महोत्सव त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. 17 डिसेंबर 2017 मध्ये मोदींनी उद्घाटन केलेल्या या धरणावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. या धरणाची पाणी पातळी 138.68 मीटर एवढी आहे.
Varanasi: People light earthen lamps to wish Prime Minister Narendra Modi, ahead of his birthday tomorrow. pic.twitter.com/3Mbjp6bZFv
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 16, 2019
Gujarat: Sardar Sarovar Dam illuminated ahead of Prime Minister Narendra Modi's visit to the site, tomorrow. pic.twitter.com/0YUYJhWawG
— ANI (@ANI) September 16, 2019
मोदींच्या वाढदिवसानिमित्त जंगी तयारी करण्यात आली आहे. पूर्ण आठवडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान स्वच्छता अभियान चालवलं जाणार आहे. गरजूंच्या मदतीसाठी रक्तदान कार्यक्रम देखील राबवला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह भाजपचा प्रत्येक सदस्य सहभागी होणार आहे.
Varanasi:Arvind Singh,a fan of PM Modi offered a gold crown to Lord Hanuman at Sankat Mochan Temple yesterday,ahead of PM's birthday,says,"Ahead of Lok Sabha polls, I took a vow to offer gold crown weighing 1.25 kg to Lord Hanuman if Modi ji formed govt for the second time"(16/9) pic.twitter.com/G6ephry6nC
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 17, 2019
दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपल्या समर्थकांनासह मोदींचा वाढदिवस इंडिया गेटवर साजरा केला. यावेळी स्पेशल केक कापण्यात आला. केकवर कलम 35 अ आणि 370 रद्द केल्याप्रकरणी मोदींना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते हजर होते.
Delhi: BJP workers led by party MP Manoj Tiwari celebrated Prime Minister Narendra Modi's birthday at India Gate. pic.twitter.com/wfxEh6dJcH
— ANI (@ANI) September 16, 2019
Bhopal: BJP workers in Bhopal cut a 69 feet long cake yesterday, ahead of Prime Minister Narendra Modi's birthday. #MadhyaPradesh (16/9) pic.twitter.com/b3Q53lzDnw
— ANI (@ANI) September 16, 2019