गांधीनगर : वृत्तसंस्था – टीकटॉक व्हिडीओसाठी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. गुजरातच्या राजकोटमधील एका व्यक्तीने जे काही केले ते वाचून तुम्ही चकित व्हाल. एका व्यक्तीने टीकटॉक व्हिडीओसाठी चक्क आपल्या जीपलाच आग लावली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे.
महत्त्वाची बाब अशी की, ज्या ठिकाणी हा टीकटॉक व्हिडीओ तयार करण्यात आला ते ठिकाण राजकोटच्या फायर स्टेशनपासून काही मीटरच लांब आहे. जीपला आग लावणारा व्यक्ती इंद्रजीत सिंह जडेजा असल्याचे समजत आहे. राजकोट पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर अनेक कलमं लावण्यात आली आहेत.
#TikTok के साइड इफेक्ट
Shocking #ViralVideo from #RajkotTikTok पर विडीओ बनाने के लिए एक सिरफ़िरे ने अपनी जीप में ही लगा दी आग। कोठारिया रोड इलाके में फायर स्टेशन के सामने की घटना। राजकोट पुलिस मामले की जांच में जुटी। @indiatvnews @CP_RajkotCity @dgpgujarat @TikTok_IN @CMOGuj pic.twitter.com/SlWpROmb5Z
— Nirnay Kapoor (@nirnaykapoor) September 2, 2019
त्याच्या साथीदाराचं म्हणणं आहे की, इंद्रजीत एका दुकानात काम करत होता जिथून त्याला काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे तो आधीच तणावात होता. जेव्हा जीप स्टार्स करून आणि धक्का देऊनही सुरु झाली नाही तेव्हा त्याने रागात येऊन जीपला आग लावली. पोलीस इंद्रजीत सिंहची चौकशी करत आहेत. अद्याप हे स्पष्ट झालं नाही की, हा व्हिडीओ इंद्रजीतने स्वत: टीकटॉकवर पोस्ट केला की त्याच्या मित्राने केला आहे.