नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याच्या कालावधीत अनेकवेळा वाढ करण्यात आली असून त्यासाठी आता ३१ मार्च २०२० पर्यंत मुभा देण्यात आली आहे. दिलेल्या कालावधीत जर आपल्या आधारला पॅन कार्ड जोडले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल, असे गुजरात उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पॅनकार्ड आधारला लिंक झाले नाही तर पॅन रद्द होणार नसल्याचे म्हटले आहे.
हायकोर्टाने सांगितल्यानुसार आधार कार्डाच्या वैधतेबाबत सध्या सर्वोच्च न्यायालय विचार करत असून जोपर्यंत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत आयकर विभाग लिंक करण्याचे आदेश देऊ शकत नाही. तसेच पॅन आणि आधार लिंक करण्याचा कालावधी सतत वाढवून देणे देखील चुकीचे असल्याचे हायकोर्टाने सांगितले आहे.
न्यायमूर्ती हर्षा देवानी अंडी न्यायमूर्ती संगीत के.विसेन यांच्या खंडपीठाने रॉजर मॅथ्यू – साऊथ इंडियन बँक लिमिटेड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्राप्तिकर अधिनियम कलम १३९AA वैध नाही. गुजरात हाय कोर्टाने अटकेत असलेल्या सौरभ सोपारकर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला होता. तसेच पॅनकार्डला रद्द घोषित करता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे. जोपर्यंत न्यायालय या केस संबंधी काही निर्णय देत नाही तोपर्यंत हा निर्णय असाच राहणार आहे. जर आयकर विभागाकडे माहिती दिली तर याबाबतची सर्व खाजगी गोपनीय माहिती हरवू शकते.
Visit : bahujannama.com