नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ फेब्रुवारीला मोदी सरकार देशाचा अर्थसंकल्प सादर करणार असून त्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्पामध्ये आयकरमध्ये मोठी सूट देण्याची घोषणा करतील अशी शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षाला ७ लाख उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के आयकर लावण्याचा प्रस्ताव आहे. सध्या तरी ५ लाख उत्पन्नावर ५ टक्के आयकर आकाराला जात असून ७ ते १०-१२ लाख पर्यंत उत्पन्न असलेल्यांकडून १० टक्के आयकर आकारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या ५-१० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांकडून २० टक्के आयकर आकाराला जातो.
वर्षाला ७ ते १० लाख रुपये उत्पन्न असलेल्यांकडून १० टक्के आयकर आकाराला जाऊ शकतो. तर १० ते २० लाख रु. उत्पन्न असलेल्यांकडून २० टक्के आयकर आकारण्याचा प्रस्ताव असून २० लाख ते १० कोटी रु. उत्पन्नावर ३० टक्के आयकर आकारला जाऊ शकतो. तसेच १० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांकडून ३५ टक्के आयकर आकारण्याचा प्रस्ताव आहे.
सरकारने जर आयकरमध्ये सूट देण्याची घोषणा करते, तर उत्पन्नधारकाकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसे राहील. याचा अर्थ वर्षाला १० लाख रुपये उत्पन्नधारकांकडे ६०,००० रुपये, १५ लाख उत्पन्नधारकांकडे १.१ लाख रु. आणि २० लाख उत्पन्नधारकांकडे १.६ लाख रु.चा फायदा होणार असून यात सेस जोडण्यात आलेला नाही. उच्च मध्यम वर्गीय आणि मध्यमवर्गीयांच्या पैशांची बचत होईल त्यामुळे गुंतवणूक वाढेल. करामध्ये कपात झाल्यामुळे बाजारात तेजी येईल. या निर्णयाचा फार काही फायदा होणार नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसेच हा काही योग्य पर्याय नाही.
Visit : bahujannama.com