पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Gravittus Foundation | आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे देण्यात येणार पहिला जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका शीलाताई आढाव (Sheelatai Adhav) यांना जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी (दि. १४) सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृहात (S M Joshi Socialist Foundation Hall) या पुरस्काराचे वितरण होणार आहे. (Gravittus Foundation)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे (Dr. Sadanand More) यांच्या हस्ते हा पुरस्कार शीलाताईंना प्रदान केला जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ लेखिका व पत्रकार प्रतिमा जोशी (Journalist Pratima Joshi) शीलाताईंची प्रकट मुलाखत घेणार आहेत. महाराष्ट्रातील समता चळवळींचे मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव (Baba Adhav) व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार (Vasudha Sardar) यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत डॉ. बाबा आढाव यांची सहचारिणी म्हणून तितकेच महत्वाचे योगदान शीलाताईंनी दिले आहे. तसेच त्या एक उत्तम परिचारिका, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे, असे ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे (Usha Kakade)यांनी नमूद केले.
Web Title : Gravittus Foundation | Gravitus Foundation Lifetime Achievement Award announced to social activist Sheilatai Adhav
हे देखील वाचा :