बहुजननामा ऑनलाइन टीम – बिझनेस प्रोसेस आउटसोअर्सिंग (BPO), आयटी आधारित सेवा (ITeS) देणाऱ्या कंपन्यांसाठी सरकारनं(Government’s ) गुरुवारी ‘वर्क फ्रॉम होम’ (Work from Home) संदर्भातील मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्यामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. यामुळे(Government’s ) यापुढे कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना अधिक सुविधा देणे सोपे होणार आहे.
लागू केलेल्या नवीन नियमानुसार, सात्यत्याने करावे लागणारे रिपोर्टिंग तसेच अतिरिक्त दिलेल्या जबाबदाऱ्या त्यात देखील सरकारनं शिथिलता आणली आहे.
परिणामी, घरातून किंवा अन्यत्र कुठेही (Work From Anywhere) काम करण्यासाठी एका पोषक वातावरणाची निर्मिती होईल.
नवीन सूचनेनुसार, एजंटलाच ओएसपी केंद्राचा रिमोट एजंट म्हटले जाईल. त्याला इंटरनेट कनेक्शनची परवानगी असेल. रिमोट एजंट देशात कुठुनही काम करू शकतो. आयटी क्षेत्रात सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून भारताची ओळख निर्माण करणे हा यामागचा उद्देश्य आहे. त्याचप्रमाणे कंपन्यांना देखील नवीन नियमांमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘वर्क फ्रॉम एनिवेअर’ संबंधित नवीन नियम आत्मसात केल्याने मोठा पाठींबा मिळेल.
एका अधिकृत निवेदनामध्ये दिलेल्या माहितीनुसार, टेक उद्योग मजबूत करणे हाच यामागचा उद्देश आहे. टेक इंडस्ट्रीकडून दीर्घकाळापासून वर्क फ्रॉम होमच्या नियमता शिथिलता आणण्याची मागणी होत होती. तसेच यापुढे वर्क फ्रॉम होम कायमस्वरूपी चालू राहण्याची शक्यता आहे.
ज्या दूरसंचार संसाधनांच्या माध्यमातून अॅप्लिकेशन, आयटी क्षेत्राशी संबंधित सेवा किंवा कोणत्याही प्रकारच्या आऊटसोअर्सिंग सेवा प्रदान करतात अशा ओएसपी कंपन्या. या कंपन्यांना आयटी, कॉल सेंटर, बीपीओ आणि नॉलेस प्रोसेस आउटसोअर्सिंग कंपन्या म्हटलं जातं. परिणामी, दूरसंचार विभागाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे घरातून काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. यात आता कुठूनही काम (Work From Anywhere) असा विस्तार केला जात आहे. यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे, की विस्तारित एजंट तसंच रिमोट एजंलटा (Work From home/Anywhere) काही अटी लागू करून मान्यता दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट
‘देशातील आयटी क्षेत्र हा आपला अभिमान आहे, संपूर्ण जग याची ताकद ओळखतो. देशातील तरुणांना पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी प्रोत्सहन दिले जाईल. विकासासाठी अनुकूल अशा वातावरणासाठी सरकार वचनबद्ध आहे.