बहुजननामा ऑनलाईन टीम : भारताच्या कंप्यूटर एमरजेंसी रिस्पॉन्स टीमने (CERT- In) व्हॉट्सअॅप यूजर्सना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. सीईआरटीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात नवीन व्हायरस आल्याने ज्याच्या मदतीने हॅकर्स आपला संगणक आणि स्मार्टफोन सहजपणे हॅक करू शकतात. या व्हयरसबद्दल, फेसबुकनेही गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपला सावधगिरीचा इशारा दिला होता. फेसबुकने म्हटले आहे की व्हॉट्सअॅपवर “स्टिक्ट-बेस्ड बफर ओव्हरफ्लोज” हल्ला होऊ शकतो, जे हॅकर्स खासकरुन व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना एमपी ४ फाईल्सद्वारे त्यांच्या डिव्हाइसवर पाठवतात.
सीईआरटीने व्हॉट्सअॅपवर दिलेल्या सावधगिरीनुसार :
१- सुरक्षेच्या अभावामुळे हॅकर्स एमपी ४ फाईलद्वारे व्हॉट्सअॅपवर सहज प्रवेश करू शकतात.
२- दरम्यान एमपी ४ फाइल विस्तार हा एक प्रकारचा फाईल स्वरूप आहे जो व्हिडिओ, ऑडिओ आणि उपशीर्षके या स्वरूपात येतो.
३- अशा व्हायरससाठी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे प्रमाणीकरण आवश्यक नसते. जेव्हा वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवरून काही प्रकारच्या हानिकारक फायली डाउनलोड केल्या जातात, त्यावेळी हा व्हायरस येतो.
४- या प्रकारचे व्हायरस हॅकरला वापरकर्त्याचे व्हॉट्सअॅप गुप्तपणे वापरण्याची परवानगी देतो.
५- हॅकर व्हॉट्सअॅप सिक्युरिटीमधील मालवेअरद्वारे वापरकर्त्यांच्या उपकरणांमधून फाइल्स चोरू शकतो. ज्यानंतर तो हेरगिरीसाठी फायलीही वापरू शकतो.
६- हॅकर्स रिमोटद्वारे वापरकर्त्यांच्या डिव्हाइसवर दूरस्थपणे नियंत्रित करू शकतात. रिमोट कोड एक्झिक्युशन (आरसीई) कोडचा एक प्रकार आहे. ज्याद्वारे हॅकर कोणाच्याही डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकतो.
७- डिव्हाइस भौगोलिकदृष्ट्या कुठेही स्थित केले जाऊ शकते.
८. यासाठी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) वापरकर्त्याला व्हॉट्सअॅपच्या नवीन आवृत्तीमध्ये अपग्रेड करण्याचा सल्ला दिला आहे.
९- सुरक्षा एजन्सीने वापरकर्त्यांना त्वरित व्हॉट्सअॅपची नवीन आवृत्ती डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला आहे. नवीन आवृत्तीमध्ये अश्या पद्धतीच्या गोष्टींना आळा बसणार आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी व्हॉट्सअॅपने एक नवीन सिक्योरिटी पॅच जारी केला आहे. सध्या सोशल मीडिया कंपनीने या हॅकिंगशी संबंधित जास्त माहिती शेअर केलेली नाही.
Visit : bahujannama.com