फिलीपीन्स : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे बहुतांश ऑफिसचे काम ऑनलाइनच होत आहेत. मुलांचे वर्ग आणि ऑफिसची मिटींग सर्वकाही ऑनलाइन होत आहे. मात्र योग्य तांत्रिक महिती नसल्यास किंवा थोडीजरी बेपर्वाई झाल्यास लोकांच्या अन्य अॅक्टिव्हिटी सुद्धा कॅमेर्यात कैद होते. असेच काहीसे फिलीपीन्सच्या एका अधिकार्यासोबत घटले आहे. येथे एक सरकारी अधिकारी कॅमेर्यावर आपल्या सेके्रटरीशी संबंध ठेवताना पकडला गेला.
कॅविटे प्रांतात फातिमा दास ग्राम कॉन्सिलच्या सदस्यांची झूम मिटींग सुरू होती. कामानिमित्त अधिकार्यांची ही मिटींग रोज होत होती. परंतु 26 ऑगस्टला झालेल्या मिटींगच्या दरम्यान कॅप्टन जीसन एस्टिल नावाच्या अधिकार्याकडून एक मोठी चूक झाली. एस्टिलला वाटले मिटींग संपली आणि थोड्यावेळानंतर एक दुसरी मिटींग होईल.
एस्टिल आपला कॅमेरा ऑन ठेवूनच उठला आणि त्याच रूममध्ये आपल्या सेक्रेटरीसोबत रोमान्स करू लागला. या दरम्यान सर्व कर्मचारी कॉन्फरन्स कॉलवर लाइव्ह उपस्थित होते. त्यांच्यापैकी एका स्टाफने आपल्या फोनमध्ये एस्टिलच्या या प्रकराचा व्हिडिओ बनवला. काही वेळानंतर जेव्हा एस्टिलला पुन्हा मिटींग जॉइन करण्याचे लक्षात आले तेव्हा त्याला समजले की, त्याचा कॅमेरा ऑनच राहीला होता.
बघता-बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. यानंतर लोकांनी अधिकार्यावर आपला राग व्यक्त केला. काही लोकांनी एस्टिलच्या विरोधात याचिका सुद्धा दाखल केली. प्रकरण तापल्याचे पाहताच स्थानिक सरकारच्या विभागाने म्हटले की, एस्टिलला नोकरीवरून तोबडतोब काढून टाकावे.
रिचर्ड जेरोनिमो नावाच्या एका अधिकार्याने सांगितले की, अधिकारी आणि त्याच्या सेक्रेटरने माफी मागितली आहे. परंतु ही साधारण घटना नाही आणि याची शिक्षा त्यांना मिळेल. व्हिडिओ समोर आल्यानंतर एस्टिल आणि सेके्रटरी दोघांनी ऑफिसला जाणे बंद केले आहे.
काही दिवसांपूर्वी ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये सुद्धा एक अशीच घटना घडली होती. जेथे व्हर्च्युअल मीटिंगदरम्यान एक अचानक संबंध ठेवताना दिसले होते.