पणजी : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. गोवा सरकारने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 31 मे पर्यंत संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गोवा सरकारने 7 जून पर्यंत राज्यात संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करुन माहिती देताना म्हटले की, गोवा सरकारने 7 जून 2021 सकाळी 7 पर्यंत संचारबंदी Curfew वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी गोवा सरकारने राज्यात संचारबंदी वाढवली आहे.
Government of Goa has decided to extend the curfew till 7 am of 7th June 2021. The orders regarding the same shall be issued by respective District Collectors.
— CMO Goa (@goacm) May 29, 2021
गोव्यात सध्या संचारबंदी Curfew आहे. सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली आहेत. उद्योग धंदे सुरु आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी चे बाजार बंद आहेत. सिनेमागृहे, जलतरण तलाव, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम सध्या बंद आहेत.