नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गूगलने आपले क्रोम अॅप्स बंद करण्याची घोषणा केली आहे. गूगलने यासाठी टाइमलाईन शेयर करून सांगितले आहे की, जून, 2022 मध्ये हे सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात येतील. 9 टू 5 गूगलनुसार, लवकरच गूगल क्रोम वेब स्टोअरवर नवीन सबमिशन घेतले जाणार नाही, कारण गुगल क्रोम अॅप्स बंद करण्यात येणार आहेत.
जारी करण्यात आलेल्या टाइमलाईन नुसार, गूगल हे पाऊल मार्च 2020 पासून उचलणार आहे, म्हणजे तेव्हा पासून याचे सबमिशन बंद करण्यात येतील.
सबमिशन बंद झाल्यानंतर डेव्हलपर्स या प्लॅटफॉर्मवर नवीन अॅप्स आणू शकणार नाहीत. परंतु, जुने अॅप्स तरी सुद्धा चालणार आहेत आणि विेशष म्हणजे सध्याच्या अॅप्समध्ये डेव्हलपर्स जून 2022 पर्यंत अपडेट देऊ शकतात.
गूगल क्रोम अॅप्स एक वेब बेस्ड अॅप्स आहेत, जे क्रोममध्ये इन्स्टॉल केले जातात. हे फोनच्या अॅप प्रमाणेच काम करतात. गूगलचे म्हणणे आहे की, हा सपोर्ट जून 2020 पासून गो विंडोज, मॅक आणि लीनक्स सारख्या ठिकाणी बंद केले जाईल. परंतु, एज्युकेशन आणि एन्टरप्राईज कस्टमर्ससाठी याचा सपोर्ट डिसेंबर 2020 पर्यंत देण्यात येईल.
गूगल क्रोम अॅप्स लोकांमध्ये जास्त पसंतीचे नाहीत. गूगल क्रोमचे स्व:ताचे स्टोअर आहे, जेथे हे अॅप्स उपलब्ध आहेत. गूगल क्रोममध्ये एक्स्टेन्शन्स सुद्धा असतात जे गूगल क्रोम अॅप्ससारखे काम करतात.