बहुजननामा ऑनलाईन – ग्राहकांसाठी भारतीय स्टेट बँक सातत्याने बदल करत आहे. एक ऑगस्टपासून बँकेकडून ऑनलाईन सुविधांशी संबंधित शुल्क आकारले जाणार नाहीत. त्यामुळे आता पैशांच्या देवाण – घेवाणच्या कार्यप्रणालीतील आयएमपीएस सेवा गुरुवारपासून पूर्णपणे मोफत होणार आहे. याचा ग्राहकांना अधिकच फायदा होणार आहे.
या सुविधांसाठी आरबीआयकडून सूट देण्यात आली आहे. तर आता एसबीआयने आपल्या ग्राहकांना या सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून याची अमलबजावणी होणार असल्याने स्टेट बँकेचे ऑनलाईन व्यवहारावर आयएमपीएस शुल्क द्यावे लागणार नाही. इन्टरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करताना ग्राहकांकडून आता आयएमपीएस शुल्क वसूल केले जाणार नाही असा निर्णय ही एसबीआयने घेतला आहे . त्याचबरोबर सर्वच टप्प्यातील एनईएफडी आणि आरटीजीएस शुल्क २० टक्क्यांनी कमी केले जाणार आहे.
त्याचबरोबर जर एक हजार रुपयांपर्यंत ऑनलाईन पैसे हस्तांतरित केल्यास आयएमपीएस शुल्क मोजावे लागणार नाही. इन्स्टंट इंटरबॅंक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा म्हणजे आयएमपीएस याच्या याच्या माध्यमातूनच तुम्ही काही क्षणातच मोठ्यात मोठी रक्कम देखील एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर पाठवू शकता. ही सेवा २४ तास चालू असते. या सुविधाच्या माध्यमातून ग्राहक दिवसातून कितीही वेळा पैसे ट्रान्सफर करू शकतो. पण यामाध्यमातून जास्तीत जास्त दोन लाख रुपये ट्रान्सफर करू शकता अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.