बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगात जारी आहे. हाँगकाँग, इटली आणि अमेरिकेत बरे झाल्यानंतर कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणे समोर आल्यानंतर लोक घाबरले होते. रिइन्फेक्शनची प्रकरणे ज्याप्रकारे वाढत आहेत, लोकांच्या मनात इम्यूनिटीबाबत अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र एका नव्या अभ्यासाने लोकांना दिलासादायक बातमी दिली आहे.
आयलँडच्या लोकांवर करण्यात आलेल्या हा अभ्यास न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. स्टडीने रिइन्फेक्शन आणि इम्युनिटीबाबत लोकांची शंका दूर केली आहे. स्टडीसाठी संशोधकांनी 30,576 लोकांकडून सीरम सॅम्पल घेतले आणि सहा वेगवेगळ्या प्रकारची अँटीबॉडी टेस्टिंग केली. संशोधकांना आढळले की, कोरोनातून बरे झालेल्या 1,797 लोकांपैकी 91.1 टक्के लोकांमध्ये चांगल्या स्तराची अँटीबॉडी होती.
स्टडीमध्ये म्हटले आहे की, अँटीबॉडीच्या स्तरात चार महिन्यात कोणतीही कमतरता दिसून आली नाही. ज्येष्ठांमध्ये इम्यून रिस्पॉन्स जास्त आढळला. कोरोना व्हायरस सर्वात जास्त आणि गंभीर प्रकारे ज्येष्ठांनाच प्रभावित करतो. अशात ज्येष्ठांमध्ये जास्त इम्यून रिस्पॉन्स आढळणे एक चांगली बातमी आहे. परिणामकारक वॅक्सीनसाठी सुद्धा जास्त इम्यून रिस्पॉन्स असणे चांगली बातमी आहे.
स्टडीनुसार संशोधनात लोकांमध्ये आढळलेल्या जास्त इम्यून रिस्पॉन्समधून ही गोष्टी स्पष्ट होते की, पहिल्यावेळी कोरोनातून बरे झाल्यानंतर रिइन्फेक्शनची प्रकरणे खुपच कमी येतात. असे समजले जाते की, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सुमारे 70 टक्के लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी असणे जरूरी आहे. अभ्यासात आयलँडच्या 1 टक्केपेक्षा सुद्धा कमी लोकांमध्ये कोरोना व्हायरस आढळला.
डॉक्टरांच म्हणणे आहे की, पहिल्या संसर्गाच्या तुलनेत दुसरा संसर्ग खुपच हलका असतो. पहिल्या वेळी संसर्गामध्ये शरीरात लढण्याची क्षमता निर्माण होते, जी दुसर्यावेळी व्हायरसला कमजोर करते.
मात्र, हे म्हणणे सध्या घाईचे ठरेल की, ही अँटीबॉडी शरीरात किती काळ राहते. हे सुद्धा होऊ शकते की, वेळेसोबत इम्यूनिटी कमी होत जाईल आणि शरीर पुन्हा व्हायरसच्या संपर्कात येईल. स्टडीचे म्हणणे आहे की, सध्या घाबरण्याची गरज नाही.