मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. आज वायदा व्यापारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्यामध्ये सोन्याच्या दरात 72 रुपयांची वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जूनमध्ये वायदा सोन्याचा भाव 10 ग्रॅम 47,604 रुपयांवर उघडला.
सोन्याचा यापूर्वी ट्रेडमध्ये वायदा व्यापारात दर 10 ग्रॅम 47,532 रुपयांवर बंद झाला होता. चांदीच्या वायदा भावातही सोन्यासारखी तेजी दिसून येत आहे. सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) मे चांदीचा वायदा भाव 412 रुपयांनी वाढून 69,086 रुपये प्रतिकिलोवर गेला होता. तर चांदीच्या वायद्याचे भाव 68,674 रुपये प्रतिकिलोवर झाले होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास एमसीएक्सवर चांदीची किंमत 68,575 रुपये प्रतिकिलो होती.
सोन्याच्या दरात वाढ
जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली असून, भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ या महिन्यात झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44,000 त्या स्तरावर पोहोचले होते.
मागील आठवड्यात घसरण
दिल्ली सराफा बाजारातील सोन्याचे मूल्य 24 रुपयांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी कमी झाले होते. सोन्याच्या किंमतीत घट झाल्यानंतर सोन्याची स्पॉट किंमत प्रति 10 ग्रॅम 47,273 रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. मागील सत्रात सोन्याचा दर 47,297 प्रति 10 ग्रॅम रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता.