नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. मागणी वाढल्याने या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. अशात दिल्लीत रेमडेसीवीर इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विकणा-या तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेले तिघेही मेडीकल दुकानदार आहेत. त्यांच्याकडून 7 इंजेक्शन जप्त केले आहेत.
Delhi: 3 arrested for black marketing of Remdesivir, 7 vials seized. They used to sell Remdesivir at Rs 70,000 per piece. Case registered, probe on. 2 of them, Likhit Gupta & Anuj Jain ran medical stores in Daryaganj & Chandni Chowk respectively; the 3rd, Akash Verma's a jeweller pic.twitter.com/p7aU0Bq7dJ
— ANI (@ANI) April 26, 2021
दरम्यान, काही दिवसापूर्वीच मुंबई, नागपूर येथे रेमेडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक केली होती. मुंबईतील मीरारोडमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारात तब्बल 16 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दोघांना पोलीसानी अटक केली होती. विशेष म्हणजे हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असून त्यांच्याकडून 5 इंजेक्शन जप्त केली होती. तर नागपूरमध्येही तब्बल 35 हजारांना इंजेक्शन विकणाऱ्याला अटक केली होती. दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे 6 डोस द्यावे लागतात. त्यामुळे, या इंजेक्शनची मागणी वाढली असून सध्या तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे इंजेक्शनची करतरता भासत असल्याने याचा काळाबाजार सुरु आहे.