मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढत असताना बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे. अक्षयने माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीतील भाजपचे खासदार गौतम गंभीर याच्या फाऊंडेशनसाठी अक्षयने 1 कोटी रुपये दान केले आहेत. स्वतः खासदार गौतम गंभीर यांनीही ही माहिती दिली. अक्षयने दाखवलेल्या या उदारपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मिडियावरही त्याचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अक्षयने यापूर्वीही कोरोनाग्रस्तासाठी मदत केली होती.
अभिनेता अक्षय कुमार यांने गरजूंना अन्न, औषधे आणि ऑक्सिजनसाठी 1 कोटी रुपये दिल्याबद्दल अक्षय कुमार याचे खूप आभार, असे गंभीर यांनी सोशल मीडियात पोस्ट केले होते. त्यावर रिप्लाय देताना अक्षयने लिहिले आहे की, हा देशासाठी खरेच कठीण काळ आहे. मला आनंद आहे, मी मदत करू शकलो. आशा आहे, आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू. गतवर्षीही अक्षयकुमारने पीएम केअर्स फंडात 25 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेला पीपीई किट्स खरेदीसाठी 3 कोटी दिले होते. मुंबई पोलिसांसाठीही 2 कोटी रुपये दिले होते. याशिवाय रोजंदारीवरील मजूर आणि बॉलिवूडमधील फोटोग्राफर्ससाठीही त्याने आर्थिक सहाय्य केले होते.