मुंबई:बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today |सोन्याच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या चार दिवसांपासून घसरण सुरू होती मात्र पाचव्या दिवशी सोन्याचे भाव वधारले आहे. सोन्याच्या भावात २६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा ४८,३०० रुपये इतका आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ४७,३०० रुपये इतका आहे. दरम्यान, चांदीच्या भावात घसरण सुरूच (Gold Silver Price Today) आहे. आजही दरात ३०० रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीचे दर ६७,५०० रुपये इतके झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या चार दिवसात सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली होती. १६ जुलैला १३० रुपये, १७ जुलैला १५० रुपये, १८ जुलैला १० रुपये तर मंगळवारी १५० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर आज सोन्याच्या दरात २६० रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होत असली तरी येत्या काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोन्याच्या किमती आवाक्यात असल्याने हाच काळ गुंतवणूक(Investment) करण्यास योग्य असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. गत वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आल आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता.
चांदीच्या भावात आजही उतार
चांदीच्या भावतही चढ उतार होत आहे. ७ जुलै रोजी चांदीच्या भावाने ७० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र त्यानंतर १४ जुलैला चांदीच्या दरात २०० रुपयांची घसरण, १५ जुलैला ३०० रुपयांची वाढ, १६ जुलैला २०० रुपयांची वाढ झाली होती. १७ तारखेला १३०० रुपयांची घसरण झाली मंगळवारीही ६०० रुपयांची घसरण झाली होती मात्र आज पुन्हा चांदीच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली.
web title: Gold Silver Price Today | If gold prices rise after four days, silver will continue to fall; Find out