नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या. सोमवारी, ८ मार्च २०२१ रोजी दिल्ली सराफ बाजारात १२२ रुपयांनी घसरून ४४ हजार रुपयांवर आल्या. त्याचबरोबर चांदीच्या भावात आज प्रति किलो ५८७ रुपयांची वाढ झाली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर १० ग्राम ४४,२३६ रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो ६४,९४७ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजार पेठांनी देखील सोन्याच्या दर कमी केले आणि चांदीची वाढ झाली.
सोन्याचे नवीन दर (८ मार्च २०२१ )
दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर १२२ रुपयांनी घसरले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ ग्रॅम शुद्धीच्या नवीन सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम ४४,११४ रुपयांवर गेला आहे. यापूर्वी व्यापार सत्रात सोन्याचा दर १० ग्रॅम ४४,२३६ रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव आज प्रति औस १,६९९ डॉलर आला.
चांदीचा नवीन दर (८ मार्च २०२१ )
चांदीच्या किंमतीमध्ये आज वाढ नोंदवली गेली. दिल्ली सराफ मार्केटमध्ये या मौल्यवान धातूची किंमत ५८७ रुपयांनी वाढून ६५,२३६ रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज चांदीची किंमत २५.३१ डॉलर प्रति औसापर्यंत पोहचली आहे.
सोन्यामध्ये घसरण का नोंदवली गेली ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांवर दिसत आहे. न्यूयॉर्क कमोडिटी एक्सेजमध्ये आज सोन्याचे भाव कमकुवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दिल्ली सराफ बाजारात मौल्यवान सोन्याच्या धातूची किंमत खाली आली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, एकदा सोन्याची किंमत वाढली की ती प्रति १० ग्रॅम ६३,००० रुपयांची पातळी ओलांडेल.