मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती (Gold Silver Price Today) उतरल्या होत्या. आता मात्र सोन्याच्या भावात साधारण वाढ होताना दिसत आहे. आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,200 रुपये आहे. तर, चांदीची किंमत 64,600 रुपये झाली आहे.
गतवर्षीच्या (2020) तुलनेत यंदा सोन्याचा भाव (Gold Price) कमीच आहे. अर्थात गेल्या वर्षी सोन्याच्या दराने 50 हजाराचा टप्पा पार केला होता. त्या तुलनेत यंदा (2021) सोन्याचा भाव 50 हजार रुपयाच्या आत आहे. सध्या सोन्याच्या किंमती कमी असल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी कमी होताना दिसत आहे. दरम्यान, या कमी किंमतीमुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना सुवर्णसंधी आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचे सोन्याचे दर (Gold Price Today) –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,400 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,200 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,200 रुपये
आजची चांदीची किंमत (Silver Price Today) – 64,600 रुपये (प्रति किलो).
Web Title : Gold Silver Price Today | gold rate price today on 23 november 2021 forecast outlook silver price rate today.
Priyanka Chopra | प्रियंका चोप्राच्या ‘या’ कृत्याने निक जोनस आणि तिच्यात होणार डिवोर्स?
Cryptocurrency | Shih Tzu ने गुंतवणुकदारांना केले मालामाल! केवळ 2 तासात 1000 रुपये झाले रू. 60 लाख