नवी दिल्ली : वृत्तसंस्था- अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात झाल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गतही दिसून आला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दहा ग्रॅम सोन्याच्या किंमती १४९ रुपयांनी घसरले आहेत. तसेच चांदीच्या किंमतींमध्ये ४७३ रुपयांनी स्वस्त झाली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जर अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध संपले तर शेअर बाजाराला वेग येईल. म्हणूनच, लोकांचा कल सोन्यापासून कमी होईल. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतींमध्ये घसरण होऊ शकते.
नवीन सोन्याचे दर –
शुक्रवारी दिल्लीतील १० ग्रॅम सोन्याचा भाव ३९०२४ रुपयांवरून आली आहे. त्याचबरोबर गुरुवारी दिल्लीत १० ग्रॅम सोन्याची किंमत ३८,९९५ रुपयांवर गेली होती. याआधी बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव दहा ग्रॅम २२५ रुपयांनी वधारून ३८,७१५ रुपये झाला.
चांदीचा नवीन भाव-
शुक्रवारी चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीची किंमत ४५,८४८ रुपयांवरून ४५,३७५ रुपयांवर आली आहे. यापूर्वी गुरुवारी चांदीचे दर ५० रुपयांनी वाढून ४५,७२६ रुपये प्रति किलो झाले होते.
३ महिन्यांत सोनं स्वस्त झाले –
आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किंमती ३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर १४४५.७ डॉलर प्रति औंस आल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव आला आहे.
Visit : bahujannama.com