बहुजननामा ऑनलाइन टीम – गुरुवारी धनतेरसच्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित घट पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने माहिती दिली की, गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 81 रुपयांनी स्वस्त(Gold Rate Today) झाले. चांदीही सपाट पातळीवर राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदी सपाट पातळीवर ट्रेंड करीत आहे. तज्ज्ञ म्हणतात की, उत्सवाच्या हंगामात दोन्ही मौल्यवान धातू हे याच पातळीवर ट्रेंड करतील.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, सध्याच्या सणासुदीच्या हंगामात सोने आणि चांदी जवळपास याच रेंजमध्ये व्यापार करतील. किरकोळ गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये कमी उलथापालथ पाहायला मिळेल. ते असेदेखील म्हणाले की, देशभरातील ज्वेलर्स दिवाळीच्या विक्रीच्या तयारीत व्यस्त आहेत. हिंदू कॅलेंडरमध्ये धनतेरस हा दिवस सोन्या-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. यंदा धनतेरस हा सण गुरुवारी व शुक्रवारी देशाच्या विविध भागात साजरा होत आहे.
सोन्याचे नवीन दर (Gold Price, 12 November 2020) – धनतेरसच्या दिवशी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 81 रुपयांनी स्वस्त झाले आहेत, त्यानंतर आता नवीन किंमत 50,057 रुपयांवर आली आहे. याआधी व्यापार सत्रात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 50,138 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,865 डॉलर होते.
चांदीच्या नवीन किमती (Silver Price, 12 November 2020) – आज चांदीच्या किमतीत फक्त 4 रुपये प्रतिकिलोने घट झाली आहे, आता चांदीची नवीन किंमत 62,037 रुपये प्रतिकिलो झाली आहे. याआधीच्या सत्रात चांदीची किंमत 62,041 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सपाट व्यापार पाहायला मिळाला. चांदीचा भाव प्रतिऔंस 24.09 डॉलर राहिला.