बहुजननामा ऑनलाईन
अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरल्या आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येत आहे. मंगळवारी घरगुती वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आलेल्या पहायला मिळाल्या. एमसीएक्सवर सोन्याचे दर दहा ग्रॅम 51 हजार रुपयांवर आले आहेत. ऑक्टोबर वायदा 0.5 टक्क्यांनी घसरून 50,803 प्रति 10 ग्रॅमवर आले. त्याचबरोबर चांदीचा डिसेंबर वायदा देखील 0.6% घसरून 67,850 प्रती किलो झाला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे घरगुती सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमती कमी होण्याची आशा कमी आहे. जर रुपयामध्ये थोडी रिकव्हरी झाली तर सोन्याच्या किंमती खाली येऊ शकतात.
सोमवारी सोन्याचे दर वाढले होते – सोमवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याच्या किंमती 258 रुपयांनी वाढल्या. यानंतर आता नवीन किंमत प्रति 10 ग्रॅम 51,877 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी सोन्याचे दर 10 ग्रॅम 51,619 रुपयांवर बंद झाले होते. चांदी (7 सप्टेंबर 2020 रोजी चांदीची किंमत) – किंमत प्रति किलो 837 रुपयांवर गेली होती. ती वाढून 69,448 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर पोहचली. याआधी चांदीचा दर प्रतिकिलो 68,611 रुपयांवर बंद होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत औंस 26.93 डॉलर होती.
मागील सत्रात सोन्याचा वायदा 0.7 टक्क्यांनी वाढला होता. सोमवारी चांदीच्या वायदामध्ये 1.6 टक्के वाढ झाली होती. मागील महिन्याच्या उच्च पातळीच्या तुलनेत सोन्याचा भाव सुमारे 5000 रुपयांनी आणि चांदीच्या किंमतीत 10,000 रुपयांनी स्वस्त आहे.
आता काय होईल- तज्ञांचे म्हणणे आहे की, देश आणि जगात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत आणि अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत आहे. तसेच भारत आणि चीनसारख्या मोठ्या बाजारात ग्राहकांची मागणी खूपच कमकुवत आहे. म्हणूनच सोन्याच्या किंमती एका श्रेणीमध्ये राहू शकतात.