नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold Price Today | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) आता वाणिज्य आणि व्यापार जगतला आपल्या विळख्यात घेत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवीन स्ट्रेनमुळे सोने (Gold Price Today) 1835 डॉलरच्या स्तरावर पर्यंत जाऊ शकते, जे सध्याच्या स्तरापासून जवळपास 2% जास्त आहे.
वाढलेला प्रतिबंध, लॉकडाऊन आणि आर्थिक हालचालींवर त्याच्या नंतरच्या प्रभावाने सोन्याच्या मागणीत तेजी येईल. तज्ज्ञांना आशा आहे की, पुढील काही दिवसात सोने 47,000 रुपयांवरून 50,000 रुपयांच्या रेजंमध्ये जाऊ शकते.
MCX वर सोन्याच्या दरात आली तेजी
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. सोन्याचा दर 0.18 टक्के वाढीसह आज 47,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.
विश्लेषकांनी संकेत दिला आहे की, जर प्रतिबंध आणि लॉकडाऊन सक्तीने लागू केले गेले तर सोन्यात मजबूती दिसेल. आज चांदी (Silver price today) 0.12 टक्के घसररून 61,668 रुपये किलोवर व्यवहार करत आहे. (Gold Price Today).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.
हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.
Web Title : Gold Price Today | gold price Today rise amid coronavirus new variant omicron outbreak.