पुणे : बहुजननामा ऑनलाइन – PDCC Election Results | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (pune district central cooperative bank election)यंदा प्रस्थापित असलेल्या जुन्या संचालकांना पराभवचा सामना करावा लागला आहे. सलग २२ वर्षे संचालक असलेले आणि माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (atmaram kalate) आणि १५ वर्षे संचालक असलेले प्रकाश म्हस्के (prakash mhaske) यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. (PDCC Election Results)
मुळशी तालुका (Mulshi) मतदारसंघातील मतमोजणीत आत्माराम कलाटे यांना १७ मते मिळाली तर सुनिल चांदेरे (Sunil Chandere ) यांनी २८ मते मिळवून विजय मिळविला आहे. (PDCC Election Results).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हवेली (Haveli) तालुका अ वर्ग प्रतिनिधी गटात गेल्या ३ निवडणुकांमध्ये विजय मिळविलेले प्रकाश म्हस्के हे चौथ्यांदा निवडून जाण्यासाठी तयार होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत झालेल्या या लढतीत विकास दांगट (Vikas Dangat) यांनी ७३ मते मिळविली तर प्रकाश म्हस्के यांना ५९ मते मिळविता आली. दांगट यांनी म्हस्के यांचा १४ मतांनी पराभव केला.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागा असून त्यापैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर ७ जागांसाठी २ जानेवारी रोजी मतदार पार पडले. आज सकाळपासून अल्पबचत भवन येथे मतमोजणी सुरु झाली असून पहिल्या टप्प्यात २ जागांचे निकाल बाहेर आले आहेत. उर्वरित जागांची मतमोजणी सुरु आहे.
web title : Pdcc election results pdcc bank pushes incumbents in elections atmaram kalate who has been the director for 22 consecutive years and prakash mhaske who has been the director for 15 years are defe.