नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई-वडीलांना मुलींच्या भविष्याची चिंता नेहमीच असते. कारण, मुले जन्माला आल्यानंतर लोक त्यांच्यासाठी पैसे जमविण्यास सुरूवात करतात आणि एक चांगली इन्व्हेस्टमेंट पॉलिसी घेण्याचे प्लॅनिंग करू लागतात. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशा पॉलिसीची माहिती देणार आहोत, जी एलआयसीने मुलींच्या विवाहासाठी तयार केली आहे. या पॉलिसीचे नाव कन्यादान योजना आहे. 121 रुपये रोज या हिशेबाने महिना सुमारे 3600 रुपयांच्या प्रीमियमवर हा प्लॅन मिळू शकतो. परंतु, कुणी यामध्ये कमी किंवा जास्त प्रीमियम भरणार असेल तरी हा प्लान मिळू शकतो. या खास पॉलिसीमध्ये रोज 121 रुपयांच्या हिशेबाने जर पैसे जमा केले तर 25 वर्षांत 27 लाख रुपये मिळतील. याशिवाय जर पॉलिसी घेतल्यानंतर मृत्यू झाला तर कुटुंबाला या पॉलिसीचा प्रीमियम भरावा लागत नाही आणि त्यांना दरवर्षी 1 लाख रुपयेसुद्धा दिले जातात. याशिवाय 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला 27 लाख रुपये आणखी मिळतात.
या वयात मिळेल ही पॉलिसी
ही पॉलिसी घेण्यासाठी 30 वर्ष किमान वय असावे आणि मुलीचे वय 1 वर्ष. हा प्लान 25 साठी सुद्धा मिळेल, मात्र, प्रीमियम 22 वर्षेच भरावा लागेल. परंतु, तुमच्या मुलींच्या वेगवेगळ्या वयाच्यानुसार सुद्धा ही पॉलिसी मिळते. मुलीच्या वयाच्या हिशेबाने पॉलिसीचा कालावधी कमी केला जाईल.
पॉलिसीबात जाणून घेवूयात
25 वर्षांसाठी पॉलिसी घेता येईल. 22 वर्षांपर्यंत प्रीमियम द्यावा लागेल.
रोज 121 रुपये किंवा महीना सुमारे 3600 रुपये.
दरम्यान वीमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला प्रीमियम भरावा लागणार नाही.
मुलीला पॉलिसीच्या उर्वरीत वर्षात मिळणार दरवर्षी 1 लाख रुपये.
पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला 27 लाख रुपये मिळतील.
ही पॉलिसी कमी किंवा जास्त प्रीमियमची सुद्धा घेता येते.
एलआयसीच्या अन्य पॉलिसींबाबत
सिंगल इनडाऊमेंट प्लान
एलआयसीच्या या योजनेत केवळ एकदाच प्रीमियम भरता येतो. ही योजना 90 दिवसाच्या बाळापासून 65 वर्षांची व्यक्ती घेऊ शकते. हा प्लान 10 वर्षांसाठी आहे. यामध्ये किमान 50 हजारचा वीमा घेता येतो, परंतु कमाल मर्यादा नाही. जर कुणी व्यक्ती किमान 50 हजार रूपयांचा वीमा घेत असेल तर त्यास 40 हजार रुपयांचा प्रीमियम द्यावा लागेल. दहा वर्षांनंतर पॉलिसी पूर्ण झाल्यानंतर 75 ते 80 हजार रुपयांच्या आसपास त्याला परत मिळतील. दरम्यान वीमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 50 हजार रुपये मिळतील.
Visit : bahujannama.com