नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आधार कार्ड हे एक महत्वपूर्ण ओळखपत्र आहे. सध्या अनेक सरकारी कामांसाठी आधार कार्डची गरज भासते. यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाइल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे. जर काही कारणामुळे तुम्ही मोबाइल नंबर बदलला असेल तर आधार नंबर डेटाबेसमध्ये तुमचा नंबर अपडेट केला पाहिजे. आधार जारी करणार्या युआयडीएआय संस्थेने आधार नंबर डेटाबेसमध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्याची माहिती नुकतीच दिली आहे. यूआयडीएआयने यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला आधारशी लिंक्ड मोबाइल नंबर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ तुमचे आधार कार्ड घेऊन जवळच्या कोणत्याही आधार सेवा केंद्रात जाऊन मोबाइल नंबर अपडेट करण्याची रिक्वेस्ट देऊ शकता.
#AadhaarUpdateChecklist
No document required to update mobile number in Aadhaar. Just carry your Aadhaar to any nearby Aadhaar Kendra and place an update request.
(Charges: Rs. 50). Get details of nearby Aadhaar Kendra from: https://t.co/oCJ66DD0fK pic.twitter.com/39HBo0netQ— Aadhaar (@UIDAI) January 21, 2020
मोबाइल नंबर अपडेट करणे का महत्वाचे आहे
आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला केवळ 50 रुपये खर्च येतो. जेव्हा तुम्ही आधार नंबरचा वापर करण्यासाठी कोणतीही व्हेरिफिकेशन प्रक्रिया करता तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवर यासाठी ओटीपी पाठवला जातो. हा ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर पाठवला जातो. अशावेळी तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर ओटीपी तुमच्या जुन्या नंबरवर जाईल. आणि ओटीपी प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. सोबतच तुम्ही तुमचे आधार अन्य कागदपत्रांशी लिंक करू शकणार नाही.
असा अपडेट करा मोबाइल नंबर
यासाठी तुम्हाला आधारशी लिंक्ड मोबाइल नंबर अपडेट करायचा असल्यास तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल. तेथे 50 रुपये खर्च करून तुम्ही आधारमध्ये मोबाइल नंबर अपडेट करू शकता. सोबतच तुम्ही तुमच्या आधार नंबरशी संबंधित कोणतीही सेवा घेणार असाल तर आधार सेवा केंद्रातून ऑनलाइन अपॉइन्टमेंट घेऊ शकता.
Visit : bahujannama.com