नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून हे दर सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत. मात्र, जेमोपाय इलेक्ट्रिकने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. या स्कूटरवर 3 वर्षांच्या सर्व्हिस वॉरंटीच घोषणा केली. ही सर्व्हिस वॉरंटी तीनही स्कूटर Gemopai Astride Lite, GemopaiRyder आणि Gemopai Miso वर देत आहे. तीन वर्षाच्या या सर्व्हिस वॉरंटी स्कीमला कंपनीने Gemopai Secure असे नाव दिले आहे. ही कंपनी गो ग्रीन इ-मोबॅलिटी आणि ओपाय इलेक्ट्रिकचे जॉइंट व्हेंन्चर आहे.
जेमोपाय मिसो मिनी या स्कूटरची किंमत 44000 रुपये आहे. यामध्ये हेक्सा हेडलाईट्स, एलईडी बॅटरी इंडिकेटर देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये 1KW डिटॅचेबल Li-ion बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी 3 वर्षासाठी 12 सर्व्हिस मोफत देणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, जेमोपाय मिसो इलेट्रि स्कूटर सिंगल चार्जमध्ये 75KM चालू शकते. ही मिनी स्कूटर 2 तासात फुल्ल चार्ज करता येते. या स्कूटरच्या देशभरात 60 पेक्षा जास्त डीलशीप आहेत ज्या ठिकाणी ही स्कूटर खरेदी करता येऊ शकते.
दोन हजारांचा डिस्काउंट
कंपनीमध्ये सध्या देशभरात साठ पेक्षा जास्त डीलशीप आहेत. ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्व्हिस सेंटर आहेत. जेमोरपाय मिसोवर 25 जुलैपर्यंतच्या सर्व बुकिंगसाठी 2 हजार रुपयांची सूट देखील कंपनीकडून दिली जाणार आहे. भारतीय बाजाराव्यतिरिक्त ही कंपनी नेपाळमध्ये देखील या स्कूटरची विक्री करत आहे.
4 रंगात उपलब्ध
ही स्कूटर चार रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्येर फेअरी रेड, डीप स्काय ब्लू, लुशीअस ग्रीन आणि सनसेट ऑरेंज रंग उपलब्ध आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूच्या संकटात एक सीटवाली स्कूटर एक सुरक्षित पर्याय आहे. ही मिनी स्कूटर वापरण्यासाठी आरटीओ परमिट गरजेचे नाही. 2 तासात चार्ज होणाऱ्या या स्कूटरची टॉप स्पीड 25KM आहे.