मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी 7 प्रकारचे डेबिट/एटीएम कार्ड जारी करते. या वेगवेगळ्या कार्डसाठी प्रतिदिन पैसे काढण्यासाठी लिमिट वेगवेगळी आहेत. जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढली तर तुम्हाला अतिरीक्त शुल्क द्यावे लागणार आहे. जाणून घेऊयात या 7 कार्डवर किती आहे पैसे काढण्याची मर्यादा.
SBI क्लासिक डेबिट कार्ड
हे कार्ड देशांतर्गतच वापरता येते. याचा वापर करून प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे. कमीत कमी मर्यादा 100 रुपये आहे. या कार्डवर इन्शूरन्स चार्ज नाही. यावर वार्षिक मेंटेनन्स शुल्क 125 रुपये प्लस GST आहे.
SBI गोल्ड इंटरनॅशनल डेबिट कार्ड
या कार्डमधून भारतात ATM मधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 50,000 रुपये काढता येऊ शकतात. अन्य देशात 50,000 रुपये एवढीच किंमत त्या त्या देशातील चलनानुसार काढता येईल. यामध्ये इन्शूरन्स शुल्क 100 रुपये प्लस जीएसटी तर वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस GST आहे.
SBI प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड
या कार्डमधून भारतात ATM मधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढता येऊ शकतात. यामध्ये इन्शूरन्स शुल्क 100 रुपये प्लस GST तर वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस GST आहे.
SBI मुंबई मेट्रो कॉम्बो कार्ड
या कार्डमधून भारतात एटीएममधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 40,000 रुपये काढता येऊ शकतात. मिनिमम डेली कॅश विथड्रॉल परदेशात वेगवेगळ्या एटीएममध्ये वेगवेगळी असू शकते. यामध्ये इन्शूरन्स शूल्क 100 रुपये प्लस जीएसटी तर वार्षीक मेंटेनन्स शुल्क 175 रुपये प्लस GST आहे.
SBI INTOUCH टॉप अँड गो डेबिट कार्ड
या कार्डमधून भारतात एटीएममधून प्रतिदिन कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 40,000 रुपये काढता येऊ शकतात. या कार्डचे वार्षिक मेंटेनन्स शुल्क 175 प्लस GST आहे.