मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडिया आजच्या काळात माहितीचे एक मोठे माध्यम बनले आहे. मात्र, माध्यमाची विश्वासार्हता सतत कमी होत आहे, कारण चुकीचे आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार १० कोटी युजर्संना मोफत इंटरनेट देणार आहे. सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. जर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी Fact Check https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.
धोखाधड़ी से सावधान!#WhatsApp मैसेज में दावा किया गया है कि भारत सरकार 3 महीने के लिए 100 मिलियन उपयोगकर्ताओं को मुफ्त इंटरनेट सुविधा प्रदान कर रही है।#PIBFactCheck: यह दावा व लिंक #फ़र्ज़ी है। भारत सरकार द्वारा ऐसी कोई घोषणा नहीं की गयी है। ऐसे फ़र्ज़ी वेबसाइट से सतर्क रहें। pic.twitter.com/08iUNUbEOM
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 1, 2021
दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक Fact Check टीमने हे स्पष्ट केले आहे की, हा फेक मेसेज म्हणजेच सरकारची अशी कोणतीही योजना नाही की जी मोफत इंटरनेट देण्यात येईल. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार १० कोटी युजर्संना तीन महिन्यांकरिता विनामूल्य इंटरनेट सुविधा पुरवित आहे. PIB Fact Check: हा दावा आणि लिंक बनावट आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही. अशा बनावट वेबसाइटपासून सावध राहा.”
दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 858 रूग्ण ‘कोरोना’मुक्त
पोलिसांशी धक्काबुक्की करणाऱ्या पती-पत्नीला पोलीस कोठडी
कोरोना संसर्गात मृत्यूचा धोका कमी करते ‘ही’ एक गोष्ट, NIMS स्टडीमध्ये दावा
कोरोनाने पुन्हा चीनचे दार ठोठावले; 23 नवे रुग्ण, अनेक शहरांमध्ये निर्बंध लागू
PNB ग्राहकांसाठी खूशखबर ! 1 जूनपासून बँकेत झाला मोठा बदल, जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा ?