चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे MLA Adv. Eknathrao Salve (वय 91) यांचे शनिवारी (दि. 13) दुपारी दीडच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. एन्काऊंटर ही त्यांची नक्षल चळवळीशी संबंधित कादंबरी बरीच गाजली होती.
अॅड. साळवे MLA Adv. Eknathrao Salve यांच्या निधनाने ध्येयवादी समाजसेवक हरपल्याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने साळवे यांनी जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करत जिल्हयाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांवर त्यांची निस्सीम श्रध्दा होती. तत्वनिष्ठता हे त्यांचे बलस्थान होते. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.