बहुजननामा ऑनलाइन – मुंबईत कोरोनाचा विस्फोट झालेला असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोना व्हायरसमुळं मृत्यू झाला आहे. ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये सचिन देशमुख यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे होते.
सचिन देशमुख हे एक अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मुंबई आणि महाराष्ट्र रणजी संघात ते खेळले होते. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. सचिन देशमुख हे मुंबईत एक्साईज एंड कस्टम डिपार्टमेंटमध्ये सुपरीटेंडेंट म्हणून कार्यरत होते.
धमाकेदार फलंदाज हरपला
एका इंग्रजी वृत्तानुसार, सचिन यांच्या नेतृत्वातील 1986 मध्ये झालेल्या कूच विहार ट्रॉफीत संघानं धमाकेदार कागिरी केली होती. सचिन यांनी स्वत: 3 सामन्यात 3 शतकं ठोकली होती. यात सचिन यांनी 183, 130 आणि 110 अशा धावा केल्या होत्या. त्यांचे जवळचे मित्र अभिजीत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
7 सामन्यात 7 शतकं
90 च्या दशकात इंटर युनिव्हर्सिटी टूर्नामेंटमध्ये सचिन देशमुख यांनी दमदार कामगिरी केली होती. 7 सामन्यात सलग 7 शतकं ठोकून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. सचिन हे मधल्या फळीतील धमाकेदार फलंदाज होते.