मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात बुरखा बंदीवर साधक -बाधक चर्चा सुरु असताना बुरख्यासोबतच राजस्थान मध्ये ६ मेच्या मतदानापूर्वी घुंगटवरही बंदी घाला अशी मागणी गीतकार जावेद अख्तर यांनी केली होती यावरून अख्तर यांना महाराष्ट्र करणी सेनेने धमकी दिली आहे. येत्या तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारू, अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवन सिंह सोलंकी यांनी दिली आहे.
यासंदर्भात करणी सेनेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अख्तर यांना उद्देशून ‘तुह्मी आपल्या मर्यादांना ओळखा. राजस्थान राज्याच्या संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करू नका. असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे तसेच जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा करणी सेनेच्या परिणामाला जावे लागेल असं त्या व्हिडिओत म्हटलं आहे.
महिला सक्षमीकरणासाठी बुरखा बंदीबरोबरच राजस्थानमधील घुंगटप्रथेवरही बंदी घालावी, अशी मागणी अख्तर यांनी केली होती. बुरख्यावर बंदी घालण्याला आपला कोणताही आक्षेप नसून, केंद्र सरकारने राजस्थानमध्ये ६ मे पूर्वी घुंगट प्रथेवरही बंदी घालावी, असे ट्विटद्वारे अख्तर यांनी व्यक्त केले होते .परंतु आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे स्पष्टीकरण देत अख्तर यांनी दोन्हींवर बंदी घालणे हे महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते.
Some people are trying to distort my statement . I have said that may be in Sri Lanka it is done for security reasons but actually it is required for women empowerment . covering the face should be stopped whether naqab or ghoonghat .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 3, 2019