बहुजननामा ऑनलाइन टीम : इराकची राजधानी बगदादमध्ये शुक्रवारी सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये १६ जण जागेवर ठार झाले आहे आणि ४५ जण जखमी झाले आहे. घडलेल्या घटनेमध्ये हल्लेखोर कारच्या ताफ्यामधून आले होते. त्यांनी बगदादच्या अल-खलानी स्केअरमध्ये घुसून आंदोलनासाठी जमलेल्या लोकांवर गोळीबार केल्याची माहिती इराकच्या गृहमंत्र्याने दिली आहे.
अल-खलानी हा परिसर दोन महिन्यांपुर्वी सरकारविरोधी चळवळीनंतर आंदोलकांच्या ताब्यात आहे. हा परिसर तहरीर स्केअरच्या बाजुला आहे. या आंदोलनानेच पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी राजीनामा देण्यासाठी भाग पाडले होते. इराकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसक आंदोलने सुरु आहेत.
यानंतर संसदेत कॅबिनेट राजीनामा १ डिसेंबरला मंजूर करण्यात आला होता. शिया राजकीय संघटनांनी आणि मिलिशिया सदस्यांनी घुसखोरी करुन हल्ला केला आहे. गेल्या दोन महिन्यांत हिंसक आंदोलनामुळे 420 हून लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
Visit : bahujannama.com