बहुजननामा ऑनलाइन टीम –कोरोना व्हायरसच्या या संकटात लोक गुंतवणूकीसाठी सुरक्षित जागा शोधत आहेत. तुम्ही देखील सुरक्षित जागा शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची योजना तुमच्यासाठी अधिक चांगली असू शकते. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि आपले पैसे कुठेतरी गुंतवायचे आहेत, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची योजना अधिक चांगली सिद्ध होऊ शकते.
पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. या योजनेतील गुंतवणूक केवळ आकर्षकच नाही तर सुरक्षितही आहे.
१० लाख रुपये गुंतवल्यास मिळणार १४ लाखापेक्षा अधिक
ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत १० लाख रुपये एकरकमी गुंतवणूक केली, तर ७.४ सरासरी चक्रवाढ व्याजदरानुसार ५ वर्षानंतर म्हणजे परिपक्वता कालावधीत एकूण रक्कम १४,२८,९६४ रुपये होईल, म्हणजे ५ वर्षात तुम्हाला ४,२८,९६४ रुपयांचा फायदा होईल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची वैशिष्ट्ये
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्ही खाते उघडल्यास वय ६० वर्षांपेक्षा जास्त असावे. याशिवाय व्हीआरएस घेणारे लोकही या योजनेत आपले खाते उघडू शकतात.
त्यात जमा करावयाची रक्कम सेवानिवृत्तीच्या बेनिफिटच्या रकमेपेक्षा जास्त नसावी.
या योजनेत वार्षिक व्याज दर ७.४ टक्के दराने मिळते, या योजनेचा परिपक्व कालावधी ५ वर्षांचा आहे.
यात एकदाच गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकीसाठी किमान १००० रुपयांपेक्षा अधिक १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.
ही योजना तुम्ही वेळेपूर्वीही बंद करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला किमान एक वर्ष पूर्ण करावे लागेल. जर तुम्ही एक वर्षानंतर बंद केली, तर ठेवीच्या १.५ टक्के रक्कम वजा केली जाईल. तसेच जर २ वर्षानंतर बंद केली, तर ठेवीच्या १ टक्के रक्कम वजा केली जाईल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत ठेवकर्ता वैयक्तिक किंवा आपल्या पत्नी/पतीसह एकापेक्षा जास्त खाते ठेवू शकतो. पण सगळे मिळून अधिकाधिक १५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाहीत.