बहुजननामा ऑनलाईन – अर्थ मंत्रालयाने रिजर्व बँकेच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. विरल आचार्य यांच्या निवृत्ती नंतर हे पद सध्या भरणे आहे. मंत्रालयाने RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवताना सांगितले आहे की, नियुक्ती ही तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल आणि संबंधित व्यक्ती पुन्हा नियुक्तीस पात्र असेल. ज्या लोकांना पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कमीत कमी २५ वर्षाचा अनुभव आहे त्यांनी अर्ज करावा. तसेच ज्या लोकांकडे भारतीय किंवा इंटरनॅशनल पब्लिक फाइनेंशियल इस्टिट्यूशन मध्ये कमीत कमी २५ वर्षे काम केल्याचा अनुभव असलेल्यांनाही /अर्ज करता येणार आहे. २४ जुलै रोजी व्यक्तीचे वय ६० पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : १९ ऑगस्ट २०१९
वयोमर्यादा : २४ जुलै २०१९ रोजी ६० पेक्षा कमी
अनुभव : पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कमीत कमी २५ वर्षाचा अनुभव किंवा इंटरनॅशनल पब्लिक फाइनेंशियल इस्टिट्यूशन मध्ये कमीत कमी २५ वर्षाचा अनुभव
वेतन : २. २५ लाख.