बहुजननामा ऑनलाईन टीम : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यू स्मिरना बीच हायस्कूलच्या एका २८ वर्षीय महिला शिक्षिकेला १६ वर्षीय विद्यार्थ्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. २८ वर्षीय शिक्षिका मेगन पेरीस मुलींच्या बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक देखील होती.
अल्पवयीन विद्यार्थ्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मेगनला अटक करण्यात आली आहे. २०१७ मध्ये मेगनला गणित विषयाची शिक्षिका म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ती स्वत: देखील या शाळेची विद्यार्थिनी होती. मेगनला सुमारे २८ लाख रुपये वार्षिक पगारावर नोकरी देण्यात आली होती. शाळेच्या एका विद्यार्थ्याने स्वतः अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली होती. अटक वॉरंट निघताच मेगनने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
मार्चपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. सुमारे ७ महिन्यांच्या तपासणीनंतर शिक्षिकेला अटक करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी अनेक मुलाखती घेतल्या आणि डिजिटल पुरावे देखील गोळा केले आहेत. तपासणीत असे दिसून आले की, शिक्षिका शाळेच्या बाहेरील कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांशी संबंध ठेवत होती. तिच्या वकिलांनी सध्या याप्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
Visit : bahujannama.com