लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक २०१९ वेळी सर्वात चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे पिवळ्या रंगाच्या साडीमधील महिला पोलीस ऑफिसर. सोशल मीडियावरदेखील या मॅडमच्या छायाचित्रांनी खळबळ माजवली होती. रात्रीतून त्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी बनल्या होत्या. वृत्तवाहिन्यांपासून वृत्तपत्रांपर्यंत लोक त्या पिवळ्या साडीवाल्या महिला अधिकाऱ्याच्या शोध घेत होते. त्यानंतर उघडकीस आले कि, त्या महिला अधिकारी लखनऊच्या पीडब्ल्यूडी विभागात कार्यरत असून रीना द्विवेदी असे त्यांचे नाव आहे. यावेळीही रीना द्विवेदी लखनऊ कॅंट विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कर्तव्य बजावत आहेत. कृष्णा नगरातील महानगर इंटर कॉलेजमध्ये त्यांची ड्युटी सुरु आहे. पोटनिवडणुकीबाबत मतदारांमध्ये असलेला उत्साह फारसा दिसत नाही. पण रीना द्विवेदी यांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत.
दुपारी ३ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार येथे केवळ २१ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. पण रीना द्विवेदी यांच्या मतदान केंद्रावर ३० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. या बूथवर एकूण एक हजार मतदार असल्याची माहिती रीना द्विवेदी यांनी दिली. त्यापैकी दुपारी तीन वाजेपर्यंत ३०० लोकांनी मतदान केले होते. यापूर्वी रविवारी रीना द्विवेदी सकाळी मतदान अधिकारी म्हणून रमाबाई मैदानावर ईव्हीएम किट घेण्यासाठी आल्या तेव्हा त्या सर्वांच्याच केंद्रस्थानी राहिली. या दरम्यान लोक त्यांच्याबरोबर सेल्फी घेताना दिसले. रीना द्विवेदीसुद्धा तिच्या प्रसिद्धीमुळे खूपच आनंदी दिसली.
एका मुलाखतीत त्या म्हणाल्या कि, माझ्या शैलीने मला जगात ओळख दिली आहे. मी सुरुवातीपासूनच फॅशनचे अनुसरण करत असले तरी. पण पीडब्ल्यूडी मध्ये नोकरी मिळाल्यानंतर संधी कमी होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी पिवळ्या रंगाच्या साडीने प्रसिद्ध झाले आणि लोकांनी मला पिवळ्या रंगाच्या साडीतील मॅडम म्हणू लागले.दरम्यान रीना जितक्या फॅशनप्रेमी आहेत, तितक्याच त्या सामाजिक बाबींचीदेखील काळजी घेत असते. त्यामुळे कैंट विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने मतदान करण्याचे आवाहनही रीना यांनी यावेळी केले.
Visit : bahujannama.com