पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – रात्री झोपल्यानंतर वडिलांनीच पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने डॉक्टरकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नराधम ३० वर्षीय बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आई आणि वडील झोपले होते. पत्नी झोपली असल्याचे लक्षात येताच नराधमाने मुलीसोबत अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने वडिलांनी रात्री हा प्रकार केल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी रात्री नराधम बापाला रंगेहाथ पकडण्यासाठी आईने नेहमी प्रमाणे झोपेचे सोंग घेतले. त्यावेळी वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमाने पुन्हा तोच प्रकार केला असता आईने पकडले. विचारणा केली असता जीवे मारण्याची धमकी दिली. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
Visit : bahujannama.com