बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रेमविवाहाचा रागातून सासर्याने सुनेचा कुर्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव इथे घडली आहे. शितल अजय लव्हारे (25) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
सासर्याने केलेल्या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू तर सासू गंभीर जखमी झाली आहे. खुनानंतर संशयित सासरा फरार झाला आहे. या प्रकरणाविरोधात बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 वर्षापूर्वी शीतलसोबत अजयने प्रेम विवाह केला होता. या विवाहाला अजयचे वडील बाळासाहेब लव्हारे यांचा विरोध होता. अजय आणि शीतल हे गेली 5 वर्षे बाहेर राहत होते. मात्र, लॉकडाऊन मुळे गावी आल्यानंतर हा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून नातेवाईकांची आणि शेजार्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून शितलचा मृतदेह ताब्यात घेउन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.