बहुजननामा ऑनलाइन टीम –रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर 1 डिसेंबर पासून सर्व खासगी आणि सार्वजनिक वाहनांवर, चारचाकी किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या वाहनांवर FASTag अनिवार्य केला होता. परिवहन मंत्रालयानं आता डिसेंबर 2017 आधी विक्री झालेल्या जुन्या वाहनांमध्ये जानेवारी 2021 पासून FASTagअनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे.
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 डिसेंबर 2017 पूर्वी ज्या वाहनांची नोंद झाली आहे त्यांच्यात पुढील वर्षी जानेवारी पासून FASTag असणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय एप्रिल 2021 पासून थर्ड पार्टी इंशुरंस प्रभावी करण्यासाठी फास्टॅग सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देखील मंत्रालयानं ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं या संदर्भात एक अधिसूचाना जारी केली आहे.
मोठी बातमी! डिसेंबर 2017 आधी विकलेल्या वाहनांसाठी देखील FASTag अनिवार्य pic.twitter.com/ICQx8LM0Ao
— TimePass (@TimePassTalks) September 4, 2020
मंत्रालयानं असं म्हटलंय की, “केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार 2017 पासून नवीन चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी FasTag अनिवार्य करण्यात आले आहेत. वाहन निर्माता आणि त्यांच्या डीलद्वारे देखील याचा पुरवठा करणं बंधनकारक आहे.
1 डिसेंबर 2017 पूर्वी विक्री केलेल्या जुन्या वाहनांना म्हणजेच एम आणि एन वर्गातील मोटर वाहनांमध्ये (चारचाकी) फास्टॅग सक्तीचे करण्यासाठी CMVR, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव जानेवारी 2021 पासून लागू होणार आहे. या मसुद्याच्या अधिसूचनेला अधिसूचित केलं असून मंत्रालयानं आता संबंधितांकडून सूचना मागवल्या आहेत.
वाहनांच्या थर्ड पार्टी इंशुरंससाठी FASTag अनिवार्य
सरकारनं जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, थर्ड पार्टी इंशुरंस करण्यासाठी देखील FASTag अनिवार्य आहे. सरकारनं याआधी गाड्यांचं रजिस्ट्रेशन किंवा त्यांचे फिटनेस सर्टीफिकेट जारी करताना गाडीत लावण्यात आलेल्या FASTag चे डिटेल्स घेण्याचे निर्देश दिले होते.