नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former Indian captain Mahendra Singh Dhoni) याने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो पुढे काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण त्याचे उत्तरही लगेच मिळाले आहे. धोनी आता शेतकरी बनला असून तो उत्त्म प्रकारे सेंद्रीय शेती करताना दिसून येत आहे. त्याच्या रांचीतील फार्म हाऊसमधील शेतात पिकलेल्या फळभाज्यांना प्रचंड मागणी आहे. आता त्याचा शेतातील माल थेट दुबईला पाठवण्यात येणार आहे. झारखंडच्या कृषी विभागाने धोनीच्या शेतातील माल दुबईला पाठवण्याची जबाबदारी घेतली आहे. याबाबतची बोलणीही अंतिम टप्प्यात आहे.
रांचीच्या भाजी बाजारामध्ये धोनीच्या शेतमालाला प्रचंड मागणी आहे. मटार आणि टोमॅटोनंतर धोनीच्या शेतातील ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला मोठी मागणी आहे. तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. नुकतीच येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली होती. आता ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरला रांचीच्या बाजारात मागणी आहे. बर्मी कंपोस्ट आणि शेणखत वापरून या ऑरगॅनिक कॉलिफ्लॉवरचे उत्पादन घेण्यात आले आहे. 20 ते 25 रुपये किलोने विकल्या जाणा-या कॉलिफ्लॉवरची चव हे केमिकलयुक्त भाजीपेक्षा वेगळी आहे. माहीच्या शेतातील टोमॅटोंना बाजारात 40 रु. किलो भाव असून. 80 किलो टोमॅटोंपैकी 71 किलो टोमॅटो विकले गेले आहेत.
India Today ने दिलेल्या वृत्तानुसार धोनीच्या शेतातील फळभाज्या दुबईला पाठवण्यात येणार आहेत. याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. झारखंड्या कृषी विभागाने धोनीच्या शेतातील माल दुबईला पाठवण्याची जबाबदारी घेतली आहे. यूएईत कोणत्या एजन्सीला फळभाज्या विकण्यासाठी द्यायची, हेही ठरले आहे. ऑस सीजन फार्म फ्रेश एजन्सीन ही जबाबदारी घेतली आहे.
फार्महाऊसमध्ये गायी अन् कडकनाथ कोंबड्याही दाखल
विशेष म्हणजे धोनीने आपल्या फॉर्म हाऊससाठी कडकनाथ कोंबड्यांची पिल्लंदेखील मागवली आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये जवळपास 2 हजार कोंबडे आहेत शिवनंदन यांनी सांगितले, येथील दूध 55 रु. लिटर विकले जात आहे. यात कसल्याही प्रकारची भेसळ नाही. पंजाबवरून एकूण 60 गाई आणण्यात आल्या होत्या. जर्सी आणि शहवाल जातीच्या गाईंच्या दूधाची विक्री बाजारात केली जात आहे.