भोकर : बहुजननामा ऑनलाईन – भोकर येथील एका कुटुंबाने चक्क नगरपरिषदेच्या आवारातच राहण्याची परवानगी मुख्याधिकाऱ्यांकडे मागितली आहे. भोकर येथील महात्मा फुले नगर येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घराकडे जाण्याचा रस्ता खोदकाम व सीसी रस्त्याचे रस्त्यावरील मटेरियल यामुळे बंद झाला आहे. तसेच डोंगरावरील पाणी घरात घुसत असल्याने घराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील साहित्य हटवा, डोंगरावरील येणारे पाणी थांबवा अन्यथा नगरपरिषदेच्या आवारात राहण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारे पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
शंकर मारोती देवकते (रा. महात्मा फुले नगर, भोकर) यांनी हे पत्र मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. नगर परिषद भोकर चा कार्यभार सुरळीत सुरू असताना अचानक तारांबळ उडाली. ती म्हणजे नगर परिषद बोगस नोकर भरती प्रकरण त्यानंतर अनेक दिवस काम काज विकास ठप्प झाला असल्याचे दिसले. अनेक रस्ते अर्धवट झाले आहे. त्यामुळे लोकांना तक्रारी द्यावा लागत आहेत. मुख्याधिकारी नगर परिषद भोकर हे वास्तव्यास नसल्याने शहरात कुठे विकास झाला का नाही. हे त्यांना कळणे कठीण झाले आहे.
आता पावसाळा सुरू असताना भोकर शहर अर्ध्या अधिक टेकडीच्या सर्व बाजूनी वसलेले आहे. त्याचबरोबर त्या टेकडीवर पडलेले पावसाचे पाणी खाली वाहत येऊन उंबरठे उंच नसतील तर घरात शिरत आहे. म्हणून अनेक नगर परिषद करून ते थांबवली आहे. तर महात्मा फुले नगर येथे प्रसिद्ध बुद्ध विहार आहे त्या विहार पासून टेकडी कडे जाणार रस्ता त्या रस्त्याचे काम थांबल्याने तो सी सी रस्ता अनेक महिन्या पासून रहदारी करण्यासाठी बंद आहे. त्यामुळे नाहक त्रास झालेला गरीब नागरिक शंकर देवकते यांनी प्रशासन आगळी वेगळी परवानगी मागितली आहे. या अर्जाने सोशिल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. प्रशासन काय उत्तर देईल ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. सदरील बाब अर्जाद्वारे तहसील कार्यालय यांना कळविले असल्याचे सांगितले आहे.