नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Facebook | प्रेमात माणूस अनेकदा वेडेपणाच्या मर्यादा ओलांडतो. त्याला योग्य-अयोग्य याची पर्वा नसते. आजपर्यंत प्रेमात स्वत: ची नस कापणे, रक्ताने पत्र लिहिणे आणि इतर कथा ऐकल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला जी प्रेमकहाणी सांगणार आहोत, त्यामधील मुलीने फेसबुकवर भेटलेल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी तिचे संपूर्ण आयुष्य पणाला लावले. ही मुलगी Facebook वर ज्या मुलाला भेटली, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. अशावेळी मुलीने मुलाच्या शरीरातून रक्त काढून ते स्वत: च्या शरीरात इंजेक्शनने भरले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रेमात अंधळे होऊन नदीत उडी मारण्याच्या कथा आता जुन्या झाल्या आहेत. आता आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक नवीन मार्ग आले आहेत. यापैकी एक म्हणजे स्वतः ला एचआयव्ही पॉझिटिव्ह बनवणे. होय, आसाममध्ये राहणार्या एका मुलीने तिचे प्रियकरावरील प्रेम दर्शवण्यासाठी स्वत: ला एचआयव्ही (HIV+) पॉझिटिव्ह बनवले आहे. तिने प्रियकराच्या शरीरातून रक्त काढून ते तिच्या शरीरात इंजेक्शनद्वारे टोचले. (Facebook)
फेसबुकवर जुळले प्रेम
वृत्तानुसार, ही 15 वर्षीय तरुणी आसाममध्ये राहते. फेसबुकवर एका मुलाशी तिचे संभाषण सुरू झाले. या संभाषणाचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले आणि एक वेळ अशी आली की मुलगी त्याच्यासोबत राहण्यासाठी घरातून पळून गेली. या फेसबुक प्रियकरासोबत तरुणी अनेकदा पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिला परत आणायचे. पण आता तिने तिच्या प्रेमाचा पुरावा देण्यासाठी जे कृत्य केले आहे त्याचा फटका तिला आयुष्यभर सहन करावा लागणार आहे.
स्वत: ला एचआयव्ही पॉझिटिव्ह बनवले
मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांना समजले. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या नात्याला आणखी विरोध केला.
याचा राग येऊन तरुणीने प्रियकराच्या शरीरातून सिरिंजद्वारे रक्त काढले आणि स्वत: च्या शरीरात इंजेक्शन दिले.
हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी दोघांनाही अटक करून मेडिकलसाठी पाठवले.
ही घटना सोशल मीडियावर शेअर होताच आजची पिढी किती अविचारी झाली आहे, याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर एकामागून एक ट्विट येऊ लागले आहेत, ज्यात लोकांनी खिल्ली उडवण्यासोबतच चिंताही व्यक्त केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Facebook | assam girl injected hiv positive boyfriends blood in her body to prove true love
हे देखील वाचा :